महाविद्यालयाचे गुणवंत विद्यार्थी
१)

कु. रंजिता खेडेकर या विद्यार्थिनीने जानेवारी २००१ मध्ये जे.एन.पी.टी उरण येथे एन.सी.सी आयोजित फायरिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला.

२)

कु. सुनील पवार याने २००३ मध्ये दैनिक सामना व प्रबोधन विचारमंच गोरेगाव यांच्या तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच इतर अनेक राज्यस्तरीय व विद्यापीठ पातळीवरील वकृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला या कामगिरीमुळे त्याची मुंबई विद्यापीठाचे तात्कालीन कुलगुरु मा.डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्याकडुन विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी मंडळावर नियुक्ती करण्यात आली.

३)

जानेवारी २००३ मध्ये मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील एच.आय.व्ही / एड्स परिषदेमध्ये रा.से.यो. विभागाने सादर केलेल्या पथनाट्यास केंद्रीय आयोग्य मंत्री मा. शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते विशेष पारितोषिक प्राप्त.

४)

कु. अजय येरुणकर याचा दि. २६ जानेवारी २००३ रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रजासत्ताकादिन संचलनात यशस्वी सहभाग.

५)

कु. मुमताज शेख या विद्यार्थीनीने दि. २६ जानेवारी २००४ रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय प्रजासत्ताकादिन संचलनात महाराष्ट्रातील एन.एस.एस. च्यावतीने मुलींचे नेतृत्व करण्यांचा बहुमान मिळविला.

६)

कु. श्वेता हाटे या विद्यार्थीनीची डिसेंबर २००४ मध्ये चिपळूण येथे झालेल्या अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धेत उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निवड.

७)

कु. मिनू हरजिंदर कलोटे या विद्यार्थीनीने जानेवारी २००६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यापीठ पातळीवरील निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळविले.

८)

सन २००७-२००८ साठी एकमताने निवड झालेल्या महाविद्यालयाचा जी.एस. श्री. संदेश सुरेश वाडेकर याला मुंबई विद्यापीठाचा स्टुडंट्स कौन्सिलचा अध्यक्ष होण्याचा बहुमान प्राप्त झाला.

९)

कु. संतोष वामन सोंडकर दि. १९ जानेवारी २००९ रोजी महाविद्यालयात झालेल्या रा.धो.चित्रे स्मृती आंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

१०) कु. तेजल रघुनाथ उतेकर जुलै २००९ रोजी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत 'तंटामुक्ती' या विषयावर झालेल्या जिल्हास्तरीय निबंधस्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
११) कु. रविंद्र किरण साळुंखे याने प्रथम वर्ष कला जानेवारी २०१० मध्ये झालेल्या रा.धो. चित्रे आंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक. याच स्पर्धेत तेजल रघुनाथ उतेकर या विद्यार्थीनीने उत्तेजनार्थ बक्षिस प्राप्त केले.
१२) कु. दर्शना जगताप व वर्षा गोळे यांनी ऑगस्ट २००६ मध्ये जे.एन.पी.टी. उरण येथे झालेल्या राज्यस्तरीय एन.सी.सी. शिबिरात चित्रकला व शूटिंग (नेमबाजी) स्पर्धेत अनुक्रमे द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
१३) कु. तेजल रघुनाथ उतेकर हिने श्रीवर्धन महाविद्यालयात सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या विद्यार्थी स्तरीय सांस्कृतिक महोत्सवात निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
१४) कु. अतुल अशोक गोड व कु. युवराज प्रभाकर खेडेकर यांची राष्ट्रीय सेवा योजना, पुणे व महाराष्ट्र राज्य उर्जा प्राधिकरण यांच्या वतीने दि. १७ जून ते ३ जुलै २००९ या कालावधीत आषाढी वारीनिमित्त आयोजित जनजागृती दिंडीत पुणे ते पंढरपूर या पायी प्रवासात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातून निवड.