विद्यार्थांची सनद

अ) महाविद्यालयाची जबाबदारी :

१)

महाविद्यालयाची ध्येय व उद्दीष्ट्ये यांची विद्यार्थांना माहिती देणे.

२)

ध्येय व उद्दीष्टांशी सुसंगत असे अनेक विविध उपक्रम राबविणे.

३)

विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शैक्षणिक उपक्रमांची योजना करणे.

४)

अध्ययन-अध्यापन प्रक्रीया प्रभाविपणे राबविणे.

५)

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने मुल्यमापन करणे.

६)

विद्यार्थ्यांच्या मुल्यमापनाची पद्धत विश्वसनीय व यथार्थ असेल याची काळजी घेणे.

७)

प्रवेश प्रक्रिया, पात्रता, शुल्करचना, शुल्क सवलती, शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य तसेच इतर सेवा सुविधा.

८)

विद्यार्थ्यांना पुरेशा व चांगल्या प्रतीच्या सेवा सुविधा पुरविणे.

९)

उद्याचे जबाबदार नागरीक घडविण्यासाठी योग्य ती मुल्ये व सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे.

 

ब) विद्यार्थ्यांची कर्तव्ये :

१)

महाविद्यालयाची ध्येय व उद्दीष्ट्ये समजावून घेऊन ती साध्य करण्यासाठी राबविण्यात येणार्‍या सर्व उपक्रमामध्ये सहभागी होणे.

२)

महाविद्यालयाचे नियम, प्रवेश प्रक्रिया, उपक्रम इ. बाबत स्वतः माहिती घेणे, यासाठी माहितीपत्रक व नियमित सूचना फलक वाचणे.

३)

महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पद्धत समजावून घेणे

४)

महाविद्यालयाच्या सर्व नियमांचे पालन करणे, तसेच वेळोवेळी सूचना फलकातून फी सवली, शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा, प्रोजेक्ट प्रॅक्टीकल्स इ. बाबत आवश्यक असणार्‍या कागदपत्रांची दिलेल्या मुदतीतच पूर्तता करणे.

५)

नियमितपणाने अभ्यास करणे.

६)

महाविद्यालयाचे ग्रंथालय, क्रिडा साहित्य, संगीत साहित्य, संगणक इ. साधनांचा जास्तीत जास्त लाभ घेणे.

७)

महाविद्यालयात वेळोवेळी घेतल्या जाणार्‍या चाचणी परीक्षांना तयारी करुन बसणे.

८)

महाविद्यालयाच्या सुधारणेसाठी आपल्या प्रतिक्रिया, मते, सूचना इ. प्राध्यापक/प्राचार्य यांना भेटून किंवा सूचना पेटीच्या माध्यमातून देणे.

९)

शिक्षणावर श्रद्धा ठेवून जीवनभर विद्यार्थी राहण्याचा प्रयत्न करणे.

१०)

महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यावर जबाबदार नागरीकाची भूमिका पार पाडून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करणे.