इथे क्लिक करा.
 
लष्करी ध्यासाचा सिक्स पॅक -विद्यार्थी अभ्यास सहलीचा अहवाल व क्षणचित्रे

सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात सहभाग दि ३ जानेवारी २०१९शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ महाड संचालित सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील चाळीस विद्यार्थ्यांनी गुरुवार दि ३ जाने २०१९ रोजी एका अनोख्या कार्यक्रमाचा प्रेरणादायी अनुभव घेतला. दै लोकमतच्या रायगड आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त लोकमतचे जनसंपर्क अधिकारी व वरिष्ठ पत्रकार श्री जयंत धुळप यांच्या संकल्पनेतून लष्करी ध्यासाचा सिक्स पॅक या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आर्मी, नेव्ही व एअरफोर्समधील यशस्वी वरिष्ठ अधिकारी १ भारत- पाक सर्जिकल स्ट्राइक यशस्वी करणारे ले.जनरल ( नि) श्री राजेंद्र निंभोरकर २ एअरमार्शल ( नि) श्री अरुण गरूड ३ भारतीय सेना मेडल प्राप्त ब्रिगेडिअर श्री विनोद श्रीखंडे ४ कर्नल श्री मदन सावंत ५ कर्नल ( नि) श्री विनायक सुपेकर ६ मेजर जनरल श्री सतिश वासाडे ७ सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य श्री रणजित नलावडे आदि मान्यवर सहभागी झाले होते. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी श्री विजय सूर्यवंशी यांनी लष्करी सेवेमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा व मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. सदर उपक्रमासाठी राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीचे विशेष सहकार्य प्राप्त झाले. जिल्हाधिकारी श्री सूर्यवंशी यांनी सहभागी लष्करी अधिकाऱ्यांची स्वतः मुलाखत घेऊन त्यांच्या यशस्वी कारकीर्दचे व त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटकांचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मुलाखती दरम्यान अधिकाऱ्यांनी पोखरण अणुचाचणी, सर्जिकल स्ट्राइक, दहशतवाद्यांबरोबरची चकमक इत्यादी चित्तथरारक स्वानुभवांची माहिती उपस्थितांना दिली. सातारा सैनिक स्कूल व पुणे येथील एनडीए या संस्थांमधून दिले जाणारे उच्चप्रतीचे प्रशिक्षण, ध्यास, सातत्यपूर्ण कष्ट, पालकांकडून प्राप्त झालेली प्रेरणा इत्यादी कारणांमुळेच बेताची आर्थिक परिस्थिती, ग्रामीण पार्श्वभूमी इत्यादी प्रतिकूल बाबींवर मात करून आपण कशा प्रकारे लष्करी सेवेत अधिकारी म्हणून कशा प्रकारे यशस्वी झालो याचे अनुभव कथन करीत सर्वच सहभागी आधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच लष्करी सेवेत जाण्यासाठी कशा प्रकारे पूर्वतयारी करावी याचे मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी हा प्रेरणादायी कार्यक्रम नककीच चिरकाल स्मरणात राहील. शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अॅड विनोद देशमुख साहेबांचे या अविस्मरणीय उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. शिवाई नागरी पतसंस्थेचे तज्ञ संचालक डॉ चंद्रशेखर दाभाडकर यांच्या समवेत स्वतः सहभागी होऊन अॅड विनोद देशमुख साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. प्राचार्य डॉ दीपक रावेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र एसटी बस सेवा उपलब्ध करून दिली.महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा सुनिल बलखंडे, अधीक्षक श्री मुकूंद पंदेरकर, रासेयोचे प्रा डॉ राम बरकुले, प्रा डॉ सुधाकर जाधव, प्रा डॉ मंगेश गोरे, प्रा स्नेहल कांबळे यांनी या आगळ्यावेगळया शैक्षणिक उपक्रमाच्या यशस्वी नियोजनामध्ये अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने सहभाग घेतला.